Navneet Rana : नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे कोर्टाचे आदेश

नवणीत राणा यांनी अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी एक याचिका मुंबई सत्र न्यायालयात यांनी दाखल केली होती.
MP Navneet Rana
MP Navneet RanaSaam TV

मुंबई: बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बनावट कागदपत्र प्रकरणी राणा यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) जाहीर करण्यात आलं होतं. त्याच वॉरंटवर आता पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश शिवडी न्यालयाने दिले आहेत.

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र (caste verification certificate) प्रकरणी शिवडी न्यायालयाने राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तर नवणीत राणा यांनी देखील अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी एक याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली होती.

पाहा व्हिडीओ -

मात्र, त्या याचिकेनंतरही मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंटला स्थगिती न दिल्याने याबाबतची पुढील कारवाई करण्याचे आदेश शिवडी कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. तर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com