लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर नवनीत राणांचा पुन्हा मीडियाशी संवाद

Navneet Rana Meets Loksabha Speaker : एका महिला खासदारासोबत असं होणं दुर्देवी आहे असं ओम बिरला म्हणाल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
Navneet Rana Meets Loksabha Speaker
Navneet Rana Meets Loksabha SpeakerTwitter/ @pragyakaushika
Published On

नवी दिल्ली: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज ते दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले. दिल्लीत त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचून दाखवला. खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, जेव्हा मी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Lok Sabha speaker Om Birla) यांना भेटले तेव्हा त्यांनी पुर्ण माहिती दिली. काय-काय झालं त्याचीही माहिती त्यांना दिली.

हे देखील पाहा -

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार ज्यांनी चुकीची कारवाई केली त्यांचं नाव मी सांगितलं. संजय पांडे यांनी कशाप्रकारे आदेश दिलेत याची माहिती त्यांनी दिली. मला ओम बिरला यांनी २३ तारीख दिली आहे. यादिवशी माझी तक्रार नोंदवून घेणार आहेत. माझ्यावर झालेल्या अत्याचारांबाबत त्यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच माझ्यासोबत खासकरून एका महिला खासदारासोबत असं होणं दुर्देवी आहे असं ओम बिरला म्हणाल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणांचेही राज्य सरकारवर गंभीर आरोप

दिल्लीली जाण्यापुर्वी राणा दाम्पत्याने प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी रवी राणा म्हणाल्या की, तुरुंगात आम्हाला एखाद्या गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक दिली असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच याविरोधात आपण दिल्लीला जात असून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत. रवी राणा म्हणाले की, आम्ही आज दिल्लीला जात आहे. ज्याप्रकारे एका महिला खासदाराला अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. पुर्ण पोलीस विभागाचा दुरुपयोग करुन राज्याचे मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) अत्यंत वाईट, द्वेषी, खुन्नस असे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांनी बीएमसीला माझ्या फ्लॅटची पाहणी करायला पाठवलं आहे. तर आपणही ऑनलाईन माझ्या फ्लॅटची पाहणी करा. सोबत संजय राऊत आणि अनिल परब यांनीही पाठवा ते खाली बसलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून नोटीस

मुंबई सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याविरोधात नोटीस जारी करण्यात आली असून नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana) यांच्या विरोधात नोटीस जारी करण्याबाबतचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकराने कोर्टात याचिका दाखल केली होती. राणा दाम्पत्याने जामीनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यामधील मीडियाशी न बोलण्याच्या अटीचे राणा यांनी उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात केला. या प्रकरणी आज मुंबई पोलिसांच्या वतीनं अर्ज कोर्टासमोर सादर करण्यात आला त्यावेळी सरकारी वकीलांनी कोर्टाला सांगितलं की, आमचा अर्ज दोघांना अटक करण्यासाठी आहे. कारण, त्यांनी जामीनाच्या अटी आणि शर्तींंचे उल्लंघन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com