Navi Mumbai Crime News: धक्कादायक! महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, पनवेल परिसरात महिन्यातील दुसरी घटना

Firing on Builder: पनवेल परिसरात महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली आहे...
Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime NewsSaamtv
Published On

>>सिद्धेश म्हात्रे..

Navi Mumbai News: पनवे (Panvel) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून त्यांना उपचारासाठी नेरुळमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Navi Mumbai Crime News
Tanaji Sawant News : सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी तानाजी सावंत आग्रही; भाजप -शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटणार?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक स्नेहल पाटील या पनवेल वरुन उरणकडे आपल्या मावसभावासोबत जात होत्या. याचदरम्यान रात्रीच्या वेळी गव्हाण फाटा येथे अज्ञात व्यक्तीने स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात स्नेहल पाटील यांच्या पायाला गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नेरुळमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही फायरींग व्यावसायिक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Navi Mumbai Crime News
Tanaji Sawant on Balasaheb Thackeray : 'बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, तानाजी सावंत यांचं धक्कादायक वक्तव्य

दरम्यान, एकाच महिन्यातील ही दुसरी गोळीबाराची घटना समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी 15 मार्च रोजी नेरुळमध्ये सावजीभाई पटेल या बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बिल्डरवर तीन गोळ्या झाडल्या. सावजीभाई पटेल आपल्या कारने नेरुळच्या अंबिका दर्शन सोसायटीमध्ये जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com