Navratri 2022: हिंदू मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर...; नवरात्रीत लव्ह जिहादचे षडयंत्र? भाजप नेत्याचे गंभीर आरोप

Navaratri Love Jihad Politics: नवरात्रीच्या उत्सवात 'लव्ह जिहाद' (Love Jihad) हे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Navaratri Love Jihad Politics
Navaratri Love Jihad PoliticsSaam TV

सुशांत सावंत,मुंबई

मुंबई: नवरात्री उत्सव (Navratri 2022) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दोन वर्षांनंतर राज्यात दांडिया आणि गरब्याचा उत्सव सार्वजनिकरीत्या रंगणार आहे. एकीकडे नवरात्रीचा उत्सव आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरू झालं आहे. नवरात्रीच्या उत्सवात 'लव्ह जिहाद' (Love Jihad) हे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. तसेच हिंदू समाजातल्या लेकींना सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजकांनी काळजी घेण्याचे आवाहन तुषार भोसले यांनी केलं आहे. (Navaratri Love Jihad Politics)

Navaratri Love Jihad Politics
Pune News : पुण्यात नवरात्र उत्सवानिमित्त 'सेक्स तंत्र' शिबीर घेणार; धक्कादायक प्रकार उघड

नेमकं काय म्हणाले तुषार भोसले?

भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत एका निवेदनात म्हटलं आहे की, आपल्या लेकी-बाळींच्या सुरक्षेसाठी गरबा, दांडिया आयोजकांनी प्रत्येकाचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासावे. नवरात्रौत्सवात गरबा आणि दांडिया आयोजकांना आमची विनंती आहे की, त्यांनी प्रत्येकाचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासावे. कारण एक मोठे षडयंत्र रचून 'लव्ह जिहाद' घडवले जाते. म्हणुन हिंदू समाजातल्या आपल्या लेकी-बाळींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे असं तुषार भोसले म्हणाले आहेत. (Tushar Bhosale Latest News)

लव्ह जिहाद म्हणजे काय?

'लव्ह जिहाद' मागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असून हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचे धर्मांतर केले जाते आणि दबाव आणण्याच्या घाट यातून घातला जातो असा दावा भाजप, आरएसएस यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटना करत असतात. (What Is Love Jihad)

Navaratri Love Jihad Politics
Pune : पुण्यात PFI च्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातलं 'सेक्स तंत्र' शिबीर प्रकरण

दरम्यान नवरात्री उत्सवाचं राजकारण होणं ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपुर्वीच पुण्यातलं नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेलं 'सेक्स तंत्र' शिबीर वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने 'सेक्स तंत्र' नावाने ही नावनोंदणी करण्यात येत होती. ही बाब उघडकीस येताच हिंदू महासंघाने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर शिबिर रद्द करण्यात आल्याचे फाउंडेशनने पुणे पोलिसांना कळवले. या प्रकरणी फाउंडेशचे संस्थापक रवी प्रकाश सिंग यांच्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Navaratri camp on sex tantra)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com