Narayan Rane: बाएमसी कर्मचाऱ्यांना शंकाचे निरसन राणे कुटुंब करणार, नारायण राणे स्वत: माहिती देणार - सूत्र

या बंगल्याच्या बांधकामात अनियमिततेचा आरोप आहे.
Narayan Rane
Narayan RaneSaam Tv

सुशांत सावंत -

मुंबई : केंद्रीय मंत्रई नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. या बंगल्याच्या बांधकामात अनियमिततेचा आरोप आहे. त्यावर बाएमसी कर्मचाऱ्यांना नेमकी काय शंका आहे, याचे निरसन राणे कुटुंब करणार असल्याची माहिती आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः बीएमसी कर्मचाऱ्यांना माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये (Narayan Rane will resolve the doubts of BMC employees about his bungalow in Juhu sources).

Narayan Rane
Narayan Rane : राणेंच्या बंगल्यावर आज कारवाईची शक्यता, जुहूच्या अधीशबंगल्यावर जाणार बीएमसी

बीएमसीचे सर्व नियम सगळ्यांना सारखे - नितेश राणे

'आम्ही सर्व नियमानुसार केले. तरीही त्यांना काही शंका असेल तर त्याचे निरसन करु. बीएमसीचे सर्व नियम सगळ्यांना सारखे', अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली. नारायण राणे (Narayan Rane) स्वतः बीएमसी कर्मचाऱ्यांना माहिती देणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

बंगल्याची तपासणी सुरु

सध्या पालिकेचे 9 अधिकारी राणे यांच्या बंगल्यावर चौकशी करत आहेत. बंगल्याची तपासणी करण्यास सुरुवात झालीये. तसेच, पालिका अधिकाऱ्यांकडून बंगल्याचे छायाचित्रण देखील केले जात आहे.

यात कुठलेही राजकारण नाही - महापौर किशोरी पेडणेकर

नारायण राणे यांच्या बंगल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याआधीही त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नियम सोडून बांधकाम झाले असेल तर महापालिका प्रशासन कारवाई करेल. यात कुठलेही राजकारण केले जात नाही. नारायण राणे यांना राजकारण वाटत असेल तर CRZ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्राची ही त्यांना नोटीस आली होती, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com