Narayan Rane
Narayan RaneSaam TV

नारायण राणेंच्या सभेतील गोंधळ प्रकरण; अनिल परब, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर यांच्यासह अन्य नेत्यांना न्यायालयाचे खडेबोल

Mumbai News: आरोपींच्या अनुपस्थितीमुळे आरोप निश्चित करता आले नाहीत, त्यांना आणखी किती संधी द्यायची? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

मुंबई : विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी(Narayan Rane) शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर सभा सुरू असताना घातलेल्या गोंधळाप्रकरणी मंगळवारी सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच मनसेसह अन्य ३८ नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच पुढील सुनावणीला आरोप निश्चित केले जाणार असल्याने न्यायालयात उपस्थित राहण्याची शेवटची संधी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

१८ वर्षांपूर्वी मतभेदामुळे नारायण राणे यांनी शिवसेना(Shivsena) सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने तेथे जमले होते. शिवसैनिकांनी सभेत गोंधळ घालण्याचा आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

त्यात पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला होता. त्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले. तेव्हा, शिवसेनेत असलेले शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar), ठाकरे गटाचे अनिल परब(Anil Parab) यांच्यासह ४८ नेते आणि अन्यांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.  (Latest Marathi News)

Narayan Rane
Ambadas Danve : शिंदे गटातील आमदाराला त्वरित अटक करा; अंबादास दानवे यांची फडणवीसांकडे मागणी

याप्रकरणी मंगळवारी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा, सदा सरवणकर सुनावणीला उपस्थित होते. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमुळे सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. निवडणूक आयोगासमोर मंगळवारी सुनावणी असल्याने अनिल परब दिल्लीत होते. त्यामुळे ते मुंबईतील न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहू शकत नाहीत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

त्यावर तुम्ही इतक्या बेजबाबदारपणे वागणार असाल तर तुमच्यावर जबरदस्तीने कारवाई करावी लागेल. ज्यांनी सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला नाही त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावू आणि वॉरंटची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असेल, असेही न्या. रोकडे यांनी सांगितले.

Narayan Rane
Government Job : विद्यार्थ्यांना मोठा धक्का! जिल्हा परिषदेपाठोपाठ आणखी एका विभागातील भरती प्रक्रिया रद्द

आरोपींच्या अनुपस्थितीमुळे आरोप निश्चित करता आले नाहीत, त्यांना आणखी किती संधी द्यायची? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच न्यायालयाचा बहुमुल्य वेळ वाया गेल्याबदद्ल आरोपींच्या सर्व वकिलांना ताकीद देऊन २२ फेब्रुवारीला आरोप निश्चित करण्यात येणार असून जर सर्व ३८ आरोपी उपस्थित राहिले नाहीत, तर सर्व आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावू असेही स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com