मुख्यमंत्रिपद शोभतही नाही, जमतही नाही; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

'बाबरी मस्जिद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, एक टक्का तरी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे का?'
Narayan Rane/Uddhav Thackeray
Narayan Rane/Uddhav ThackeraySaam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई : बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) गुणांचे मुल्यमापन कोणी करू नये, ते कर्तृत्ववान होते त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, ती भोळे म्हणून नव्हे, त्यांच्याकडे माणूसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं. मात्र, साहेबांनी कमावले ते काहींना टिकवता देखील आलं नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thckeray) केली. ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, "झेप उद्योगिनी" आणि "वी एमएसएमई" आयोजित 'महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२' चे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना राणे (Narayan Rane) म्हणाले, महाराष्ट्राने जी प्रगती केली, त्यातील ३४ % वाटा मुंबईचा आहे. राज्यातील नागरिकांनी उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करावी तसंच बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कोणीही करू नये. बाळासाहेब कर्तृत्ववान होते त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली भोळे म्हणून नाही, त्यांना माणुसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं,साहेबांनी कमावले काहींना ते टिकवता आलं नाही. उद्धव ठाकरेंना साहेबांच मूल्यमापन करण्याची नैतिकता नाही. मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र दिनी लोकांना देण्यासारखं बोला, गरिबी, निरीक्षितता, दरडोई उत्पन्न यावर बोलावं, जमेल ते करावं, राजकारण जमत नाही, मुख्यमंत्री पदावर शोभतही नाही आणि जमतही नाही. आज महाराष्ट्र १० वर्षे मागे नेण्याचं काम त्यांनी केलं असल्याची गंभीर टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Narayan Rane/Uddhav Thackeray
फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस, शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये - दीपाली सय्यद

मुख्यमंत्र्यांना सांगा भोंगे काढावेत, केंद्राने का धोरण ठरवावे, नाचत येईना अंगण वाकडे, काहीतरी कर्तृत्व दाखवा, बाबरी मस्जिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, एक टक्का तरी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे का? एक दिवस तरी ते जेलमध्ये गेले आहेत का? आयत्या बिळावर नागोबा, शरद पवारांच्या आशीर्वादाने तेवढे बसले आहेत. मंत्रालयात न येता 5 वर्ष कसे पूर्ण करणार असा सवाल विचारात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com