मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे Chipi Airport उद्या उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवरती आज केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. "पाहुणे म्हणून आम्ही बोलावले आहे, पाहुणे म्हणून या आणि पदा प्रमाणे निधी देऊन जा" असं वक्तव्यं राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. (Narayan Rane criticizes the Chief Minister)
हे देखील पहा -
पहिल्यापासूनच श्रेयवादाच्या लढाईत आणि उद्घाटनाच्या तारखांमुळे चर्चेत असणारे सिंधुदुर्ग Sindhudurg मधील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहुर्त अखेर उद्यावरती येवून ठेपला आहे. तरी देखील या विमानतळाच्या श्रेयवादाच राजकारण थांबलेलं नाही कोकणात राणे समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी करत हे काम राणेंमुळेच सार्थकी लागल्याचे बॅनर लावले आहेतच मात्र हे काम आपण केल्याचा पुनरुच्चार राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषेद केला आहे.
"पाहुणे म्हणून आम्ही बोलावले आहे, पाहुणे म्हणून या आणि पदा प्रमाणे निधी देऊन जा" असा टोला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मोदी साहेबांनी सात वर्षात विकास कसा करावा हे दाखवून दिले आहे भाजप हे लोककल्याणासाठी आहे या उद्धाटाला मान देतो पण हे आम्ही केले हे त्यांनी सांगावे असं म्हणतच माननीय उद्धव ठाकरे यांचा सन्मानच असल्याच वक्तव्यं देखील राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेत केलं.
राजकारणात प्रोटोकॉल Politics Protocol असतो पण माझेच नाव छोटे का? केले कोकणात हायवे Kokan Highway व्हावा यासाठी पुढाकार घेतला नितीन गडकरी Nitin gadkari यांनी तरतूद केली विनायक राऊत Vinayak Raut यांनी काय केले रेतीच्या गाड्या विनायक राऊत यांनी अडवल्या. शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी कंत्राटदाराला धमकावत कार घेतल्या याचे फोटो आहेत माझ्याकडे जिल्ह्याच्या विकास कामात पैसे खाल्ले गेले आणि खासदार झाले असे गंभीर आरोप देखील राणे यांनी यावेळी केले. त्याचवेळी पुढच्यावेळी सिंधुदुर्ग मध्ये एकही सेनेचा आमदार नसेल असा विश्वास दाखवत त्यांनी सेनेला एकप्रकारे येणाऱ्या निवडणुकांसाठी आव्हानच दिले आहे.
Edited by - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.