Good News: राणीबागेतल्या या गोंडस बछड्याचं झालं बारसं! बाळाचं नाव काय ठेवलं? पहा...

Good News For Mumbaikars: १० वर्ष नंतर १२-२-२०२० रोजी औरंगाबादमधून बंगालच्या वाघांची जोडी आणली होती. शक्ती वाघ आणि करिष्मा वाघीण आहेत. या दोघांनी एका बछड्याला जन्म दिला आहे.
Naming Ceremony Of Tiger & Penguin of Mumbai Zoo
Naming Ceremony Of Tiger & Penguin of Mumbai ZooThe Mumbai Zoo
Published On

मुंबई: प्राणीप्रेमी मुंबईकरांसाठी एक मस्त गुड न्यूज (Good News) आहे. मुंबईतील जिजामाता उद्यान येथील प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या एका वाघिणीच्या पिल्लाचं (बछड्याचं) आज बासरं साजरं करण्यात आलंय. या मादी बछड्याच्या आईचं (वाघीणीचं) नाव करिष्मा तर वडिलांच (वाघाचं) नाव शक्ती असं आहे. सहा महिन्यांपुर्वी करिष्मा (Karishma) आणि शक्ती (Shakti) या वाघांच्या जोडप्यानं एका गोंडस पिलाला जन्म दिला होता. आज मुंबई महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाने या मादी बछड्याचं नामकरण (Naming) केलं असून या पिलाचं नाव 'विरा' (Vira) असं ठेवण्यात आलंय. (Naming Ceremony Of Tiger & Penguin of Mumbai Zoo)

हे देखील पहा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी याबबात पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. आपल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, १० वर्ष नंतर १२-२-२०२० रोजी औरंगाबादमधून बंगालच्या वाघांची जोडी आणली होती. शक्ती वाघ आणि करिष्मा वाघीण आहेत. या दोघांनी एका बछड्याला जन्म दिला आहे. १४-११-२०२१ रोजी मादी बाळाला जन्म दिला होता. 'विरा' असं नाव आपण या मादी बछड्याला देत आहोत. ६ महिने काळजी घेणार आहोत. हे बारसं म्हणायला हरकत नाही. आज लोकांनी आम्हाला हिणवलंय, पण सुरक्षा पूरवल्यामुळे हे छान बाळ जन्माला आलं आहे. त्यामुळे आपण बारसं साजरा करायला हरकत नाही. आम्ही केक कापून हे बारसं आज साजरं करतोय असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Naming Ceremony Of Tiger & Penguin of Mumbai Zoo
The Mumbai Zoo: मुंबईतील राणीबागेतल्या वाघीणीचं आणि तिच्या बछड्याचं सुंदर नातं...

पेंग्विन नामकरण:

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील हम्बोल्ट पेंग्वीन कक्षातील डोनाल्ड (नर) व डेझी (मादी) यांनी दि. ०१-०५-२०२१ रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव 'ओरिओ' असे ठेवण्यात आले होते. आता हम्बोल्ट पेंग्वीन कक्षातील मोल्ट (नर) व फ़्लिपर (मादी) यांच्या जोडीने दि. १८-०८-२०२१ रोजी जन्म दिलेल्या पेंग्वीन नर पिल्लाचे नामकरण करण्यात येत असून त्याचे नाव 'ऑस्कर' असे ठेवण्यात येत आहे. केप कापून हे बारसं साजरं होतंय. या केक वर दोन्ही बचड्यांची नाव आहेत. विरा आणि ऑस्कर आदित्य उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून पेंग्विन मुंबईकर आणि भारतातल्या लोकांना ही पर्वणी आहे. या वातावरणात दोन पिल्ल जन्माला आले आहेत. चांगली सुश्रुषा सुरू आहे, बाळ मोठं होई पर्यंत नावात घाई केली नाही, पण आता नाव ठेवलंय 'ऑस्कर' अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com