Nagar : नगरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात दाखल

नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे.
shivsainik, nagar, eknath shinde
shivsainik, nagar, eknath shindesaam tv
Published On

नगर : राज्याचे (maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना (shivsena) पदाधिकारी व नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अहमदनगर शहरातील काही आजी, माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाऊन आले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनिल शिंदे यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Nagar Latest Marathi News)

शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजिव नगरसेवक योगीराज गाडे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवक योगीराज गाडे, शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, मदन आढाव, सुभाष लोंढे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, चंद्रकांत शेळके, आकाश कातोरे आदींचा यात समावेश आहे.

shivsainik, nagar, eknath shinde
विसरू नका, मी काय कांड केले माहितीहेत ना ! सेनेच्या महिला संघटकाचा एकनाथ शिंदे गटास इशारा
Eknath Shinde With Nagar Shivsainik
Eknath Shinde With Nagar Shivsainiksaam tv

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या शिवसैनिकांचे आभार मानत. त्यांनी सूचविलेल्या गाेष्टी केल्या जातील असं आश्वासन दिलं आहे. शिवसैनिक माेठ्या संख्येने शिंदे गटात गेल्याने नगर शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

shivsainik, nagar, eknath shinde
Satara : 'बारामतीकरांचे राज्य आता संपलं आहे, हे ध्यानात घ्या अन् नीट वागा'
shivsainik, nagar, eknath shinde
Nashik : ...तर राम सेतू पूल पाडावा लागेल : महापालिका आयुक्त
shivsainik, nagar, eknath shinde
शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com