अंबरनाथमध्ये नाल्यातला गाळ रस्त्यावर; पालिकेच्या डंपरने रस्त्यावर टाकला गाळ

बी केबिन रोडवर घाणीचे साम्राज्य
Ambernath News
Ambernath NewsSaam Tv
Published On

अंबरनाथ - पालिकेकडून सध्या शहरात सुरू असलेली नालेसफाई ही खरोखर नालेसफाई आहे? की हातसफाई? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण नाल्यातून काढलेला गाळ हा चक्क रस्त्यावर टाकून दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवर यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. अंबरनाथ (Ambernath) शहरात सात प्रमुख नाले असून इतर छोटे नाले, गटारं आहेत. या नाल्यांच्या सफाईला दरवर्षी मे महिन्यात सुरुवात होते.

मात्र यंदा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. यानंतर घाईघाईनं जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने नाल्यांमधला गाळ काढण्यात आला. मात्र हा गाळ थेट रस्त्यावर टाकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात शुक्रवारी पालिकेकडून नाल्यातला गाळ काढण्यात आला. मात्र हा गाळ डंपरमधून बी केबिन रोड या मुख्य रस्त्यावर ओतून देण्यात आला.

हे देखील पाहा -

या प्रकाराची लाईव्ह दृश्यं सुद्धा टिपण्यात आली. त्यामुळं सध्या मुख्य रस्त्याचा ३० टक्के भाग गाळ आणि घाणीनं व्यापलाय. हा गाळ उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदाराची नाही का? असा प्रश्न यानंतर विचारला जात आहे. या गाळामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावरही घाण पसरत आहे.

Ambernath News
सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; सोमय्यांचा राऊतांवर गंभीर आरोप

शिवाय एखादा मोठा पाऊस आला, तर हाच गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अंबरनाथ पालिकेकडून ही नालेसफाई सुरू आहे? की हातसफाई? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत. दरम्यान, याबाबत पालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी याबाबत काहीही बोलायला नकार दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com