मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा सुरु; रात्रीची संचारबंदी हटवली, वाचा नवे नियम!

मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या अटोक्यात आली येऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे.
Mumbai Night Life
Mumbai Night LifeSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या अटोक्यात आली येऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे. कोरोना आकडेवारीप्रमाणे मुंबईत काल केवळ एक हजार रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे मुंबईतील रात्रीची संचारबंदी (Night Curfew) हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Mumbai News Updates)

तसेच मुंबईत आजपासून सुधारीत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याप्रमाणे मुंबईतली सर्व पर्यटन स्थळही खुली होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी गूड न्यूज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) सुरूवातीलचा ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईची चिंता वाढली होती. मात्र, काही दिवसात रुग्णसंख्या सतत नियंत्रणात येत आहे. सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने प्रशासनाने लागू करण्यात आलेले निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे.

Mumbai Night Life
VIRAL VIDEO: चमकदार डोळ्यांच्या रहस्यमय प्राण्याने बोटीवर बसलेल्या मच्छिमाराचा पाठलाग केला अन्...

हे असतील नवीन नियम;

  1. टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन, पार्क सुरु राहणार.

  2. मैदानी खेळ- क्षमतेच्या २५% पर्यंत परवानगी.

  3. स्विमींग पुल, वॉटर पार्क ५०% क्षमतेनं सुरु राहणार.

  4. रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह ५०% क्षमतेनं सुरु.

  5. लग्नकार्यात क्षमतेच्या २५% किंवा २०० जणांना परवानगी.

  6. भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना ५०% क्षमतेनं परवानगी.

  7. अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल.

  8. स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.

  9. चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार.

  1. रात्रीची संचारबंदी उठवली

  2. मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार

  3. स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

  4. अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल

  5. चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार

  6. स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू

  7. रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू

  8. धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी

  9. लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

  10. खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com