Mumbai AQI News: दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईची हवा प्रदूषित; मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ वर

Mumbai Air Quality Index News: विशेष बाब म्हणजे मुंबईपेक्षा दिल्लीची हवा कमी प्रदूषित होती.
Air Pollution Mumbai
Air Pollution MumbaiSaam Tv
Published On

Air Pollution In Delhi & Mumbai: मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत बुधवारपेक्षा जास्त हवेतील निर्देशांक खालावला आहे.

तापमानातील घट आणि पश्चिमेकडील वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे हवेत प्रदूषण राहते. त्यामुळे बुधवारी मुंबईचा निर्देशांक १९७ एक्युआय (Air Quality Index) तर दिल्लीच्या हवेतील निर्देशांक १९३ एक्युआय एवढा होता. विशेष बाब म्हणजे मुंबईपेक्षा (Mumbai) दिल्लीची हवा कमी प्रदूषित होती. त्यामुळे मुंबईदेखील दिल्लीच्या प्रदूषणाच्या स्पर्धेत आहे की काय असं वाटू लागलं आहे. या प्रदूषित हवेपासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. (Delhi-Mumbai Air Quality Index)

Air Pollution Mumbai
Pune Half Marathon: ...असा इव्हेंट होतो तेव्हा अधिक लोकं धावतात! पुणे हाल्फ मॅरेथॉनचं चंद्रकात पाटील यांच्याकडून कौतुक

एअर क्वालिटी इंडेक्सचे प्रमाण खालीलप्रमाणे मोजले जाते

एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50: उत्तम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100: चांगली हवा

एअर क्वालिटी इंडेक्सः 101 ते 200 मध्यम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यानः खराब हवामान

एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यानः हवा अत्यंत खराब

एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वरः मानवी आरोग्यास हानिकारक

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com