सांताक्रुज: विद्यार्थ्यांसह बेपत्ता झालेल्या पोतदार शाळेच्या स्कूल बसचे सत्य उलगडले

सांताक्रूझमधल्या पोतदार स्कुलमधला धक्कादायक प्रकार.
School Bus
School BusSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: सांताक्रूझमधल्या पोतदार स्कुलमधला धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. साडेबारा वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन निघालेली बस साडेचार पर्यंत नॉट रीचेबल असल्याने मुलांच्या सुरक्षेवरून मुलांचे पालक थेट शाळेत पोहोचले होते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर नॉट रिचेबल असलेली बस पुन्हा सापडली. मात्र, या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही 5 तासांत संपर्क का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आज शाळेचा होता पहिला दिवस, 6 वाजता शाळेला गेलेली मुलं साडेचार पर्यंत घरी पोहोचली नाहीत. शाळेच्या म्हणण्यानुसार साडेबारा वाजता शाळा सुटली मुलांना घेऊन निघालेली गाडी साडेचार पर्यंत कुठे होती ? असा पालकांचा सवाल होता. सांताक्रूझ पोलीस पोतदार स्कुलमध्ये दाखल झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोतदार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आज नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत गेली. परंतु दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस ही निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नाही यामुळे पालक भयभीत झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

बस नेमकी कुठे होती?

शाळा सुटून जवळपास 5 तास होत आले तरी बसचा अद्याप पत्ता लागला नव्हता. ही बस नेमकी कुठे होती. याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु बस सापडल्यानंतर, शाळेकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, कोरोन नंतर पहिल्यांदा शाळा सुरू झाली. ड्रायव्हर नवीन आहे. त्याला बहुतेक रुट माहित नसावे अस शाळेने सांगितलं.

Attachment
PDF
Press Note Poddar School.pdf
Preview

ड्रायव्हरचा फोनही स्विच ऑफ!

शाळेला गेलेली आपली मुलं अजूनही घरी न परतल्याने, पालकांनी आपआपल्या परीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पालकांनी स्कूलबसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत होता अशी माहिती पालकांकडून देण्यात आली.

बसमध्ये नेमकी किती मुले?

प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 15 पेक्षा जास्त मुले होती असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com