Mumbai: कामगाराने घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं केलं अपहरण अन्...

मालकासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून कामगाराने त्याच्या 4 वर्षाच्या मुलाचे केले अपहरण..
Mumbai: कामगाराने घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं केलं अपहरण अन्...
Mumbai: कामगाराने घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं केलं अपहरण अन्...सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : मुंबईच्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपहरणाची Kidnapping in Mumbai एक विचित्र घटना समोर आली आहे. एका कामगाराने आपल्या मालकासोबत वाद झाला आणि रागातून चक्क मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं आहे. माहितीनुसार, आरोपीनं मुलाचं गुपचूप अपहरण करून त्याला नाशिक Nashik येथे आणलं होतं.

हे देखील पहा-

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली आहे. तसेच 4 वर्षीय मुलाची सुटका करून त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन पोलिसांनी केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपी कामगाराचं नाव अजय तिवारी आहे. तर महेंद्र बालोडीया असं फिर्यादीचं नाव असून ते ठक्कर बाप्पा कॉलनीतील रहिवासी आहेत. फिर्यादी महेंद्र यांचा चपलीचा व्यवसाय Footwear Business आहे, त्यामुळे त्यांच्या दुकानात चप्पल बनवण्यासाठी चार-ते पाच कामगार काम करतात. आरोपी अजय तिवारी देखील त्यांच्या दुकानात चप्पल तयार करण्याचं काम करत असे. तर काही दिवसांपूर्वीचआरोपी कामगार अजय तिवारी आणि मालक महेंद्र बालोडीया यांच्यात वाद झाला होता.

Mumbai: कामगाराने घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं केलं अपहरण अन्...
भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणीला सोडवायला जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठार

दारू पिऊन कामावर Alcohol Drunk आल्याने मालक बालोडीया यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे अजयचा महेंद्र यांच्यावर राग होता. याच रागातून मालकाला धडा शिकवण्यासाठी आरोपीनं महेंद्र यांच्या 4 वर्षीय मुलाच्या अपहरण करण्याचा कट रचला.

त्याने 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं पण ओळखीच्या काही जणांनी अजय हा बालोडीया यांच्या मुलाला घेऊन जात असल्याचं पाहिलेलं होतं. त्यानंतर महेंद्र यांनी आसपासाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळेस अजय मुलाला घेऊन जाताना दिसला होता.

आपल्या मुलाचं अपहरण झाल्याचं कळताच महेंद्र बालोडीयांनी तातडीने मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात Neharu Nagar Police station Mumbai धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या Mobile Location आधारे आरोपीच्या शोध घेतला आहे. मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या Nashik Police मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि वर्षीय चिमुकल्याची सुटका केली आहे. तर घटनेचा पुढील तपास नेहरू नगर पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com