

Mumbai Cable Stayed Bridge : वरळी-वांद्रे सी लिंक हा मुंबईतील पहिला केबल स्टेड पूल आहे. याच्या जोडीला आता मुंबईतला दुसरा आणि पूर्णपणे जमिनीवरचा पहिला केबल स्टेड पूल पूर्ण झाला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड येथील केबल-स्टेड रोड ओव्हरब्रिज लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. या नव्या ओव्हरब्रिजमुळे मुंबई शहराची शान वाढणार आहे.
रविवारी नागपुरमधील एका कार्यक्रमामध्ये महारेलचे प्रमुख राजेश कुमार जैस्वाल यांनी रे रोड केबल-स्टेड रोड ओव्हरब्रिजचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरु केला जाईल असेही त्यांनी म्हटले. या ओव्हरब्रिज पूलाचे काम फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरु झाले होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महारेल) देखरेखीखाली या प्रकल्पाचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रे रोडवरील हा केबल-स्टेड ओव्हरब्रिज दोन रॅम्पसह ३८५ मीटरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये सहा लेन पादचारी मार्ग आहेत. या प्रकल्पासाठी १४५ कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज बांधण्यात आला होता. पण खर्चाची रक्कम वाढून १७५ कोटी रुपये इतकी झाल्याचे म्हटले जात आहे. हा केबल-स्टेड पूलाच्या डिझाईनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. रे रोडवरील जुना ओव्हरब्रिज पूल हा १९१० साली बांधण्यात आला होता. त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त १.५ लेन होत्या.
रे रोड केबल-स्टेड ओव्हरब्रिज पूल उभारताना डिझाईनमध्ये कार्यक्षमता आणि नाविन्याला प्राधान्य देण्यात आले आहे. महारेलद्वारे या केबल-स्टेड ब्रिजवर LED लाईट्सनी सजावट केली जाणार आहे. कमी जागेमध्ये विस्तृत बांधकाम करण्यासाठी लिमिटेड पायर्स आणि केबल-स्टेड टेक्लोनॉलीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे अंडरग्राउंड सोईसुविधांमध्ये हस्तक्षेप कमी झाल्याने बांधकामाला गती मिळून रहदारीची गैरसोय झाली नाही. हा पूल बॅरिस्टर नाथ पै रोड आणि ईस्टर्न फ्रीवेला जोडतो. त्यामुळे पुलाखालून वाहतुक करणे सोपे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.