Fake Currency : सावधान! तुमच्या खिशातील ५०० रुपयांची नोट नकली? बाजारातून ८० लाखांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा बाळगून त्या बाजारात वापरणाऱ्या गुन्हेगाराला पवई परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Fake notes seized
Fake notes seizedSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News : मागील काही दिवसांपासून बाजारात बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. या नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा बाळगून त्या बाजारात वापरणाऱ्या गुन्हेगाराला पवई परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

Fake notes seized
Crime News : संतापजनक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; यमुना महामार्गावरील खळबळजनक घटना

सौजन्य भूषण पाटील (वय ३१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नावं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून 500 रुपयांच्या तब्बल 80 लाख रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट नोटा प्रकरणातील मास्टर माईंडचा (Crime News)  सध्या पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होता. या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. पोलीस अधिकारी सतीश कांबळे कक्ष- १०, गुन्हे शाखा यांना दिनांक २७/१२/२०२२ रोजी भारतीय चलनाच्या बनावट नोटा स्वत:कडे बाळगुन दैनंदीन व्यवहारामध्ये आणणाऱ्या टोळीबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

Fake notes seized
Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात मोठी दुर्घटना! माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी आंबेडकर गार्डन परिसरात सापळा रचला. त्यावेळी आरोपी एक दुचाकी, लाल रंगाच्या बॅगसह या ठिकाणी संशयितरित्या उभा असलेला आढळून आला. त्याच्याजवळ असलेली बॅग चेक केली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या ८० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com