mumbai police rescue drowning couple near gateway of india
mumbai police rescue drowning couple near gateway of indiasaam tv

Gateway Of India: समुद्रात बुडणा-यांचा मुंबई पाेलिसांनी वाचविला जीव; डीजींनी केले काैतुक

दोरीच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
Published on

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाजवळील (Gateway of India) कट्ट्यावर बसलेले दाेन पर्यटक समुद्रातून आलेल्या एका माेठ्या लाटेमुळं सुमद्रात पडल्याचे काही लाेकांना दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या पाेलिसांनी दिली. ताेपर्यंत संबंधित पर्यटक हे समुद्रात बुडत हाेते. अखेर अथक परिश्रमानंतर दाेघांना वाचविण्यात पाेलिस कर्मचा-यांना यश आले. त्याची दखल वरिष्ठ पाेलिस अधिका-यांनी घेत काैतुक केले. (mumbai police rescue drowning couple near gateway of india)

रविवारी विकास साळवी आणि निकिता दमानिया हे दोघे पर्यटक गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई (mumbai) विभागाच्या यलोगेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एका बोटीच्या सह्याने पाेलिसांनी दाेन्ही पर्यटकांना (tourists) समुद्राच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले.

mumbai police rescue drowning couple near gateway of india
Bronx Fire: न्यूयॉर्क शहरातील आगीत ९ मुलांसह १९ मृत्यूमुखी; ध्वज अर्ध्यावर घेतले

ही घटना रविवारी घडली हाेती. दाेन्ही पर्यटकांना वैद्यकीय उपचारासाठी एका क्लिनिक दाखल करण्यात आले. यलोगेट पोलीस ठाण्याच्या बचाव पथकात एएसआय वसईकर, एएसआय मनोज पाटील, एएसआय जोर्वेकर आणि पोलीस हवालदार बुंदिले यांचा समावेश होता. या सर्व बचाव पथकाचे DGP संजय पांडे यांनी काैतुक केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com