Holi Guidelines: होळी, धुलीवंदन साजरी करताना 'हे' नियम लक्षात ठेवा! मुंबई पोलिसांचे आवाहन; पालन न केल्यास होणार कारवाई

Mumbai police issues guidelines for holi festival: नियम न पाळल्यास कारवाईचाही इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Holi Festival 2023)
holi festival 2023
holi festival 2023Saam Tv
Published On

Mumbai Police: मुंबईसह राज्यभरात आता होळी आणि धुलीवंदनाच्या धामधुमीला लवकरच सुरूवात होणार आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचे सण ५ मार्च ते ११ मार्च या कालावधीत साजरे केले जाणार आहेत.

या सणांसाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी खास नियमावली तयार केली आहे. या नियमाखाली सण साजरे करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले असून नियम न पाळल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News Update)

holi festival 2023
Raj Thackeray News: 'राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय...' राज ठाकरेंचा संताप, म्हणाले; '22 तारखेला डायरेक्ट...'

रंगपंचमी, होळी, आणि धुलीवंदन उत्सव काळात 'या' नियमांचे पालन करावे..

  • या कालावधीत फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू, गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये.

  • रंगपंचमी साजरी करताना पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू किंवा फेकू नये.

  • तसेच रंग खेळताना रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे मारू किंवा फेकू नये.

  • सणांच्या काळात अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण करू नये किंवा अश्लील गाणी सुद्धा बोलू नयेत.

  • हावभाव किंवा नक्कलेचा वापर करून नये.

  • कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावेल अशी चिन्हे, चित्रे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू, गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये. (Mumbai Police Guildlines)

holi festival 2023
Raj Thackeray News: सध्या मतदारांना काहीच किंमत नाही; राज ठाकरेंना असं का वाटतंय?

दरम्यान, या आदेशाचे कोणीही उल्लंघन केले किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत केली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाणार आहे. हे आदेश व नियम ५ मार्च २०२३ ते दिनांक ११ मार्च २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com