Mumbai Police: होळी पार्ट्यांमध्ये ड्रग्ज तस्करीचा डाव उधळला, मुंबई पोलिसांकडून 1 कोटीचे ड्रग्ज जप्त

होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी कारवाई केलीये.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam Tv
Published On

मुंबई: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी कारवाई केलीये. पोलिसांनी 1 कोटी 30 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणा पोलिसांनी ड्रग्ज तस्करीसाठी बिहारमधून मुंबईला आलेल्या दोन आरोपींना अटक केलीये (Mumbai police arrested two people and seized more than 3 kilograms of cannabis valued at Rs 1.30 Crores).

यावेळी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोट्यावधींचे चरस जप्त केले आहे. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी संतोषनगर परिसरातून चरस तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे.

पार्ट्यांमध्ये ड्रग्ज तस्करीचा डाव

होळीच्या (Holi) सणासाठी मोठ्या फिल्म स्टार्सकडून पार्ट्यांचे आयोजन केलं जात. याच पार्ट्यांमध्ये हे ड्रग्ज तस्करी (Drugs Smuggling) करणार असल्याची प्राथमिक माहितीत समोर आली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 3 किलोहून अधिक चरस अंमली पदार्थ जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 कोटी 30 लाख इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी येथील संतोष नगर परिसरातील शिवशाही प्रकल्पात काही लोक चरस विकण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तेथे आलेल्या दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडून 3 किलोपेक्षा जास्त चरस आढळून आले.

गौरवकुमार प्रसाद (19) आणि कृष्णकुमार पंडित (26) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आता अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांना हे चरस पुरवठा करणार होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com