मुंबई : देशभरासह राज्यात सध्या दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली जातेय अशातच दिवाळीत फटाके फोडण्यावरून काही मुस्लिम तरुणांनी ट्विटरवरून मुंबई (Mumbai) पोलिसांना तक्रार केली. या तक्रारीनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे.
'ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा', असं ट्विट मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
दिवाळी सणानिमित्त सोमवारी रात्री लक्ष्मीपूजन झालं. लक्ष्मीपूजनानंतर राज्यासह मुंबईतील नागरिकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. पण, मध्यरात्री फटाके खूप वाजत असल्याने सलमान खान नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांत ट्विटरवरून तक्रार केली. रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या ट्विटला उत्तर देत संबंधितांना कळवण्यात आल्याचे सांगितले. यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक ट्विट करत इशारा दिला आहे. 'ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं'.
'अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा', असं म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud