Mumbai News: बायकोसोबत लोकलमध्ये भांडण करणाऱ्या महिलेचा पती समजून रेल्वे गार्डलाच मारलं, CCTV व्हिडीओ व्हायरल

Man Assaulted Railway Guard: याप्रकरणी रेल्वे गार्डला मारहाण करणाऱ्या महिलेच्या पतीविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
Mumbai News
Man Assaulted Railway GuardSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये (Mumbai) रेल्वेच्या गार्डला ( Railway Guard) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला रेल्वे प्रवाशाच्या पतीने रेल्वे गार्डला मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) व्हायरल झाला आहे. याप्रकरणी रेल्वे गार्डला मारहाण करणाऱ्या महिलेच्या पतीविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट- विरार लोकलमध्ये प्रवासादरम्यान दोन महिलांची बाचाबाची झाली. या दोन्ही महिलांचे लोकलमध्ये जोरदार भांडण सुरू होते. त्यामुळे इतर रेल्वे प्रवाशांना त्रास होत होता. अशामध्ये लोकलमधील सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही महिलांना आरपीएफ पोलिस ठाण्यात जमा केले. पोलिसांनी घेऊन गेल्यामुळे यामधील एका महिलेने आपल्या पतीला फोन करून याबाबतची माहिती दिली.

Mumbai News
Mumbai BJP Office Fire : मोठी बातमी! मुंबईतील भाजप कार्यालयाला आग

बायकोचा फोन येताच धावत धावत तिच्या नवऱ्याने आरपीएफ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात फोनवर बोलत उभ्या राहिलेल्या रेल्वे गार्डला तो आपल्या बायकोसोबत भांडण करणाऱ्या महिलेचा पती असल्याचे समजला. त्यामुळे त्याने थेट रेल्वे गार्डच्या तोंडावर जोरात चापट मारली. जोरात फटका लागल्यामुळे रेल्वे गार्ड खाली पडला. त्यानंतर ही व्यक्ती बायकोसोबत भांडण करणाऱ्या महिलेसोबत वाद करू लागला.

Mumbai News
Priyanka Gandhi: पीएम मोदींनंतर प्रियंका गांधींची पुण्यात होणार मोठी सभा, ४ लोकसभा मतदारसंघांचा करणार दौरा

ही संपूर्ण घटना आरपीएफ पोलिस ठाण्यात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अडवले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा वसई पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या वक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Mumbai News
Mumbai-Pune Express Way Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा भीषण अपघात, पोलिस उपनिरिक्षकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com