Mumbai News: तळीरामांचा उपद्रव! होळी साजरी करताना नॅशलन पार्कला लावली आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

Borivali National Park Fire: बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या तळीरामांनी आधी पार्टी केली नंतर जंगलालाच आग लावली. या घटनेत अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले.
Mumbai News: तळीरामांचा उपद्रव! होळी साजरी करताना नॅशलन पार्कला लावली आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक
Borivali National Park FireSaam Tv
Published On

मुंबईमध्ये होळीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. संजय गाधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या तळीरामांनी आग लावली. यामुळे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सुरक्षारक्षक आणि पोलिस तपास करत आहेत.

होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या जंगलामध्ये गेले होते. दहिसर परिसरात हे तळीराम होळीनिमित्त पार्टी करत होते. होळी साजरी करत असताना चक्क या तळीरामांनी जंगलाला आग लावली. ही आग हळू हळू वाढत गेली आणि जंगलामध्ये सगळीकडे पसरत गेली. आग वाढत चालल्याचे पाहून तळीरामांनी घटनास्थळावरून पळ काढला.

जंगलाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग अटोक्यात आणण्यात यश आले. पण तोपर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले. या घटनेमुळे मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत.

आधी जंगलाला वनवा लागल्याचे म्हटले जात होते. पण नंतर हा वनवा नसून जंगलाला आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शीनी ही माहिती दिली होती. ही आग कोणी लावली?, हे तळीराम नेमके कुठून आले होते? याचा तपास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सुरक्षारक्षक आणि पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com