PM Modi Visit: आमदार अस्लम शेख आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई

Congress MLA Aslam Shaikh And Naseem Khan: मालवण येथील घटनेवरून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
PM Modi Visit: आमदार अस्लम शेख आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई
congress mla aslam shaikh and naseem khanSaam Tv
Published On

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना पोलिसांनी अटक केली. तर काँग्रेस नेते नसीम खान यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मु्ंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला आहे.

मालवण येथील छत्रपची शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरून आता काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बीकेसीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारायचा प्रयत्न करणार आहेत. पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही?, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही? असा सवाल काँग्रेसने मोदींना विचारला आहे. आज पीएम मोदी बीकेसीतील जियो कन्वेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिंटेक फेस्टला संबोधित करणार आहेत.

मोदींच्या मुंबई दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार वर्षा गायकवाड यांच्या चेंबूर येथील घराबाहेर पोलिसांची मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली होती.

PM Modi Visit: आमदार अस्लम शेख आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई
PM Narendra Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या महाराष्ट्र दौरा, कसा असेल संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम

काँग्रेस नेते नसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस नेते नसीम खान यांच्या घरी पोलिस गेले होते. साकीनाका जरीमरी येथील त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन पोलीस दाखल झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभास्थळी काँग्रेस नेते मूक आंदोलन करणार होते. आंदोलनापासून रोखण्यासाठी मुंबईतील काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या घरी पोलिस दाखल होत त्यांना ताब्यात घेत आहेत. भाई जगताप यांच्या घरी देखील पोलिस पोहचले आहेत.

PM Modi Visit: आमदार अस्लम शेख आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई
Congress MLA Resign: काँग्रेस आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, आज भाजपात करणार प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com