मुंबईच्या गोवंडीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लपाछपी खेळत असताना ९ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. आपल्या भावंडांसोबत खेळत असताना या मुलीला दोरीचा फास लागला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीच्या शिवाजीनगरमधील बैंगनवाडी परिसरामध्ये आकृती सिंह ही ९ वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. आकृती रविवारी आपली भावंड आणि शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत घरामध्येच लपाछपी खेळत होती. यावेळी पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास आकृतीच्या गळ्याभोवती लागला.
आकृतीच्या मोठ्या बहीणीने तात्काळ घराबाहेर धाव घेत शेजारच्यांना बोलावून आणले. आकृतीच्या आईने आणि शेजारच्यांनी तिच्या गळ्याभोवती लागलेला फास काढून रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी आकृतीला मृत घोषीत केले. या घटनेमुळे आकृतीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी तपास केला तर मुलीचा मृत्यू दोरीचा फास लागल्यामुळे झाल्याचे समार आले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे गोवंडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.