Mumbai News: १४ व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला, ४ कामगारांचा मृत्यू

Malad Building Slab Collapse: मालाड पूर्वेच्या दिंडोशीतील गोविंदनगर येथील एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक १४ व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला. यामध्ये ४ कामगारांचा मृत्यू झाला.
Mumbai News: १४ व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला, ४ कामगारांचा मृत्यू
Malad Building Slab CollapseSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ कामगारांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मालाडच्या दिंडोशीमध्ये ही घटना घडली आहे. एसआरए इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आक्रमक झोपडीधारकांनी पोलिसांना घेरावा घातला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मालाड पूर्वेच्या दिंडोशीतील गोविंदनगर येथील एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक १४ व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला. स्लॅबसोबत ७ कामगार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेनंतर झोपडीधारक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना घेराव घातला. झोपडीधारकांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी देखील घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांना विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून आजच एसआरए मुख्याधिकारी कल्याणकर यांना पत्र लिहून तात्काळ काम थांबावणायासाठी आदेश काढण्याची विनंती करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com