
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढचे ७ दिवस जर तुम्ही मेट्रोने प्रवास करणार असाल तर आधी ही माहिती वाचा. पुढचे सात दिवस मेट्रो 2Aआणि मेट्रो7 मार्गिकेतील मेट्रो सेवा उशिराने धावणार आहे.
मेट्रो मार्गिका ७ आणि ९ चे एकत्रिकरण केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर या मेट्रो मार्गिकांमध्ये वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली–ओवरीपाडा) आणि मार्गिका ९ (दहिसर पूर्व–काशीगाव) यांच्या प्रणाली एकत्रीकरण (System Integration) आणि सुरक्षा चाचण्या १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत.या कालावधीत मेट्रोतील वेळापत्रकात बदल केले आहे.
मेट्रो एकत्रिकरणासाठी होत असलेल्या चाचण्यांमुळे मेट्रो मार्गिका २ए आणि ७ या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या सेवांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या काळात मेट्रो सेवा नेहमीपेक्षा काही मिनिटे धावणार आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ शकतो. यामुळे प्रवाशांनी वेळेआधी निघावे.
मेट्रोचा “लाल मार्गिका विस्तार” प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये अंधेरी ते मिरा-भाईंदरदरम्यान अखंड मेट्रो प्रवासासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. RDSO ची तपासणी २३ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत.
गुंदवली ते काशीगावदरम्यान ट्रायल रन घेतली जाणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne ॲप, महा मुंबई मेट्रो चे सोशल मीडिया हँडल्स आणि स्थानकावरील माहिती फलक तपासावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.