IPS Rashmi Shukla: IPS रश्मी शुक्लांना हायकोर्टाचा दिलासा, 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
rashmi shukla
rashmi shuklaSaam Tv
Published On

मुंबई: पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

rashmi shukla
IPS Rashmi Shukla: फोन टॅपिंग IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली आहे. राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) त्यांना दिलासा दिलाय आणि येत्या 25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone Tapping) केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिसात (Bundgarden Police Station) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या राजकीय लोकांचे फोन टॅपिंग करुन गोपनीय माहीती उघड केल्याप्रकरणी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्य सरकारची गोपनीय माहिती लिक केली असा आरोप त्यांच्यावर आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप

दहशतवादी प्रकरणांच्या तपासासाठी फोन टॅपिंगची परवानगी दिली होती, पण त्यात महाविकास आघाडी सरकारच्याही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत रश्मी शुक्लांवर अनेक आरोप करत रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. मे 2021 मध्ये मुंबई सायबर सेलच्या टीमने हैदराबादमधील घरी जाऊन शुक्ला यांचा जबाब नोंदवला होता, या जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे फेटाळून लावले होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com