Video : मासे खवय्यांसाठी मोठी बातमी! बाजारात मासळीचे भाव अचानक गगनाला भिडले; काय आहे कारण?

मच्छिमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे.
Mumbai Fish Market
Mumbai Fish MarketSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : तुम्ही मासे खवय्ये आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या समुद्राला बेभान उधाण आले आहे. मात्र, असे असताना देखील मच्छिमारांच्या जाळ्यात मासळीच सापडत नाहीत. यामुळे मच्छिमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)

यावर्षी 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली असली तरी समुद्रात आलेल्या विविध संकटांमुळे मासेमारीचा हंगाम वाया गेला आहे. सध्या समुद्राला उधाण असले तरी नवी मुंबईसह (Navi Mumbai) रायगडच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने नौका परतल्या आहेत. रायगडच्या समुद्रात मासळीचा मोठा तुटवडा असून मासळीचे उत्पादन कमालीचे घटले आहे.

Mumbai Fish Market
Maharashtra Politics : राष्ट्रवादीची औरंगजेबाचा महाल दुरुस्त करण्याची मागणी; भाजपच्या बड्या नेत्याची आगपाखड, म्हणाले...

सध्या रायगडच्या समुद्रात छोटी मासळी देखील मिळणे दुरापास्त झाले असून सुरमई, रावस, पापलेट, जिताडा, घोळ अशी मोठी मासळी डोळ्यांनाही दिसेनाशी झाली आहे. मासळीचे उत्पन्न 50 टक्क्याहून अधिक घसरले असल्याने मासळी खवय्यांच्या ताटातून मासळीच गायब होण्याच्या मार्गांवर आहे.

मासळीची आवक घटल्याने मासळीचे दर देखील गगनाला भिडलेत. यामुळे मासे खवय्ये ग्राहकही मासळी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. शासनाकडूनही दुर्लक्ष होत असून ऐन मौसमात मासे का मिळत नाही याच प्रश्नाचे उत्तर खलाश्यांना सापडेनासे झाले आहे.

मासळीच्या शोधात गेलेला दर्याचा राजा आता खाली हात परतत असून यामुळे मासे खवयांच्या ताटातील मासळीच दुर्लभ होत चालली आहे.

Mumbai Fish Market
Gold Silver Rate : सोन्या-चांदीचे दर कडाडले, आता १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये

मासे खवय्यांची चिंता वाढली

मासळींची (Fish) आवक घटल्याने मासळीचे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मासळी खाणाऱ्या खवय्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. मासळीचे भाव वाढल्याने मासे खाणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com