
मुंबई: मुंबई महापालिकेचं अग्निशमन विभाग आणखी अद्यावत होणार आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात अग्निशमन विभागाचे अग्निशमन केंद्र आहेत. पण आता अग्निशमन विभागाकडून (Fire Brigade) मुंबईतल्या (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी ४० छोटे अग्निशमन केंद्र उभारली जाणार आहेत. सुरुवातीच्या काळात ५ केंद्र सध्या उभारली जात आहेत. या केंद्रांमुळे अग्निशमन विभागाला आपली क्षमता वाढवून दुर्घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना करणं सोप्पं होणार आहे. 'प्रोग्राम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स' उपक्रमांतर्गत ही केंद्र उभारली जाणार आहेत. (Mumbai Fire Department will be more updated...)
हे देखील पहा -
या छोट्या अग्निशमन केंद्राच्या उभारणी बरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात रोबोट घेतले जाणार असून, त्यांचाही वापर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे फायर बाईक्स घेतल्या जाणार आहेत. एखाद्या उंच ठिकाणी पोहचण्यासाठी लागणाऱ्या उंच शिड्या देखील घेतल्या जाणार आहेत. यामुळे मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या घटनेनंतर आग लवकर विझवण्यासाठी अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता येणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.