Fire In Mumbai: मुंबईतील ताडदेवमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

मुंबईतील ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग लागलीये.
Fire In Mumbai
Fire In MumbaiSaam Tv

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळथ आहे. मुंबईतील ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग लागलीये. कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले होते. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Mumbai Fire breaks out in Tardeo 20 Storey kamala building).

Fire In Mumbai
ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसान

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईतील (Mumbai) ताडदेव (Tardeo) परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथे ही कमला इमारत आहे. भाटिया रुग्णालयाच्या शेजारी ही इमारत आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग (Fire) लागल्याची माहिती आहे. 20 मजली ही इमारत असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागलीये.

Fire In Mumbai
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना; विमानाला ओढणाऱ्या वाहनाला भीषण आग

ही आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाने (Fire Brigade) दिलीये. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन, 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु आहेत., अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलीये.

या आगीमध्ये 15 जण जखमी (Injured) झाले आहेत. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com