Crime News : मुलीला 'आयटम' म्हणणं लैंगिक शोषणच; कोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, तरुणाला दीड वर्षाची शिक्षा

एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आयटम म्हणून हाक मारणे, तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

मुंबई : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आयटम म्हणून हाक मारणे, तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणात न्यायालयाने २५ वर्षीय आरोपी तरुणाला दीड वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा (Crime News) सुनावली आहे. एखाद्या मुलीला आयटम असे संबोधित करणे हे लैंगिक शोषणापेक्षा कमी नाही, असे निरीक्षण पोक्सो न्यायालयाने नोंदवले आहे.

Crime News
Crime News : आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार; काळिमा फासणारी घटना

काय आहे प्रकरण?

२०१५ मध्ये १६ वर्षीय पीडिता मुलगी शाळेतून घरी जात असताना वाटेत २५ वर्षीय एका व्यावयासिक तरुणाने तिची वाट अडवली. आरोपीने 'क्या आइटम किधर जा रही हो' असे म्हणत मुलीची छेड देखील काढली. इतकंच नाही तर आरोपीने पीडित मुलीचे केसही ओढले. आरोपीच्या या कृत्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली. या प्रकरणाची विशेष पोक्सो न्यायाधीश एस.जे. अन्सारी यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आल्याचे आरोपीच्या वतीने सांगण्यात आले. पीडित मुलगी आपल्या संपर्कात होती, आमच्या मैत्रीला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता, त्यामुळे आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं आरोपीकडून सांगण्यात आले.

Crime News
Viral Video : भाजप मंत्र्याला राग अनावर; थेट महिलेच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल

मात्र, आरोपीने केलेला मैत्रीचा युक्तिवाद पीडित मुलीने जबाबात कुठेही नोंदवलेला नाही. आरोपीने केलेली कृती सकृतदर्शनी लैंगिक शोषण असल्याचे मान्य केले. या घटनेच्या एक महिना आधीपासूनच आरोपी हा पीडितेचा पाठलाग करत होता.

लैंगिक शोषणाच्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. महिलांसोबत होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी अशा रोडसाईड रोमियोंना धडा शिकवणे आवश्यक असल्याचे म्हणत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार देत दीड वर्षांची शिक्षा ठोठावली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com