Mumbai Crime : अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक

मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीस मुंबईत आणून तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newssaam tv
Published On

Mumbai Crime News : मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीस मुंबईत आणून तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कक्ष - १० गुन्हे शाखेने मालवणी मालाड परिसरातून दोन व्यक्तींना अटक केली आहे.चंदन शेख आणि अबिर मिध्ये अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत.

Mumbai Crime News
Solapur Crime News : जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

या दोन्ही दलाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस (Police) ठाणेच्या हद्दीत दोन व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता अल्पवयीन मुली व स्त्रिया पुरवून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती कक्षा 10 गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना मिळाली होती.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची नियुक्ती करून दिलेल्या पत्त्यावर बोगस ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगी आणि दोन व्यक्ती आढळून आले.

Mumbai Crime News
BMC Budget 2023-24: मुंबई महानगरपालिकेचा 50 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज होणार सादर ;मुंबईकरांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?

या व्यक्तींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली आता ते दोघेही ग्राहकांना वेश्यागमनासाठी आकर्षित करून त्यांच्यासाठी गरजू अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायाकरिता प्रवृत्त करून देह विक्री करण्याकरिता पश्चिम बंगाल येथून आणून पूरवत असल्याचे कबूल केले.

दोन पंचायत समक्ष परिस्थितीचा पंचनामा करून दोन्ही व्यक्तींना तसेच पंधरा वर्षे सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई करिता मालवणी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com