धक्कादायक! प्रियकराच्या घरातच प्रेयसीने घेतला गळफास; कारण ऐकून पोलिसही हैराण

प्रणाली लोकरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणींचे नाव आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

मुंबई : प्रियकराने व्हाट्स अ‍ॅप (whatsapp) नंबर ब्लॉक केल्याचा राग आल्यामुळे एका तरुणीने प्रियकराच्याच घरी जाऊन गळफास घेतला. मुंबईच्या बोरीवली (Mumbai Crime) रेल्वे स्थानक परिसरातून सोमवारी (16 मे) ही घटना उघडकीस आली. व्हाट्स अ‍ॅप नंबर ब्लॉक केल्यावरून तरुणीचा आणि प्रियकराचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, तरुणीने थेट प्रियकराच्या घरी गळफास घेतला. प्रणाली लोकरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणींचे नाव आहे. (Mumbai Crime News Girlfriend Commits Suicide By Hanging Herself In Boyfriends House)

Mumbai Crime News
औरंगाबाद हादरलं! रुम पार्टनर बाहेर जाताच मैत्रिणीला खोलीवर बोलावलं अन्...

पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नात गेले होते, त्यानंतर प्रणालीने तिच्या प्रियकरासोबत रात्री त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी मान्य न करता तिला घरी जाण्यास सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर प्रणाली आपल्या घरी निघून गेली. मात्र घरी गेल्यानंतरही तिने तिच्या प्रियकराला वारंवार कॉल करून मला तुझ्या घरी यायचं आहे असा आग्रह धरला.

वारंवार विनंती केल्यानंतरही प्रणाली ऐकत नसल्याने तिच्या प्रियकराने तिचा नंबर ब्लॉक केला. मध्यरात्रीच्या सुमारास प्रणाली पुन्हा प्रियकराच्या घरी गेली. आणि व्हॉट्स अ‍ॅपवर तिचा नंबर ब्लॉक करण्याबद्दल त्याला विचारपूस केली. त्यानंतर प्रियकराने तिला शांत करत केले आणि तो झोपी गेला.

दरम्यान, सकाळी तिच्या प्रियकराला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला प्रणाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती प्रियकराने तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, प्रणालीने खरचं गळफास घेतला आहे का याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com