Mumbai Crime News: तळोजा कारागृहातून एजाज लकडावाला मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने एजाज लकडावाला याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
Ejaz Lakdawala
Ejaz LakdawalaSaam Tv
Published On

मुंबई: कुख्यात गुंड एजाज लकडावाला विरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने एजाज लकडावाला याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले आहे (Mumbai Crime Branch has took Ejaz Lakdawala in custody from Taloja Jail).

Ejaz Lakdawala
Mumbai Crime: कुख्यात गुंड एजाज लकडावाला याच्या विरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल...

नेमकं प्रकरण काय?

खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एजाजविरुद्ध (Ejaz Lakdawala) हॉटेलच्या मालकाकडून 2 कोटी रुपये खंडणी (Ransom) मागितल्याचा आरोप आहे. एजाजने पीडितेला इंटरनॅशनल नंबरवरुन फोन करुन धमकावून व्यवसाय नीट चालवायचा असेल तर दोन कोटींची खंडणी मागितली होती. एजाजला गेल्या वर्षी पाटणा येथून अटक (Arrest) करण्यात आली होती.

जून 2013 ते मार्च 2017 दरम्यान लकडावालाने व्यावसायिकाला धमकावले होते, मात्र लकडावालाने दिलेल्या धमकीमुळे त्या व्यावसयिकाने पोलिसात धाव घेतली नाही.

पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी

पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) व्यायसायिकाला दिली होती. या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडावाला याच्या विरोधात मुंबईत 25 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हा अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग होऊ शकतो.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com