मुंबई क्राईम ब्रांचची धडक कारवाई; डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटीला अटक

रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Riyaz Bhati
Riyaz BhatiSaam Tv
Published On

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीचा सदस्य आणि जवळचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेच्या AEC (Anti Extortion Cell) ने अटक केली. रियाझ भाटी (Riyaz Bhati) आणि छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील (Andheri) एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी वाहने आणि पैसे उकळले होते. याच प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाने रियाज भाटी याला अंधेरी परिसरातून अटक (Arrest) केली आहे.

Riyaz Bhati
Shivsena Crisis : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

क्राइम ब्रँचचा हा तपास पुढे नेण्यासाठी आता सलीम फ्रुटच्या कोठडीची गरज असून, त्यासाठी गुन्हे शाखेने एनआयए कोर्टात अर्जही केला आहे. त्यानुसार पोलीस रियाज भाटीला आज न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाकडून केला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि 7 लाखांहून अधिक रुपये उकळले होते. व्यावसायिकाने जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आता तुरुंगात असलेल्या सलीम फ्रुटलाही ताब्यात घेणार आहेत. तर रियाझ भाटीला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोण आहे गँगस्टर भाटी?

भाटी हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध आहे. भाटी यांच्यावर खंडणी, जमीन हडप, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टच्या सहाय्याने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली होती.

भाटी हा 'या' प्रकरणात आरोपी

परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांच्याविरुद्ध गोरेगाव येथे जुलैमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात भाटी हा सहआरोपी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजेच्या सांगण्यावरून भाटी हा बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळून वाजेला देत असे. याप्रकरणी त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने सप्टेंबरमध्ये रद्द केला होता. तेव्हापासून तो फरार होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com