Borivali Crime: दोघांचा एकीवर जीव जडला अन् घडलं भयंकर; दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, असा झाला पर्दाफाश

Mumbai Crime News: या प्रकरणात पोलिसांनी ताबडतोब सुत्रे हलवत अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.
Borivali Crime
Borivali CrimeSaamtv

संजय गडदे, प्रतिनिधी...

Borivali Railway Station Crime News: प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या रागातून २६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना बोरीवलीमध्ये घडली आहे. बोरीवली रेल्वे स्टेशनच्या हद्दीत या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी ताबडतोब सुत्रे हलवत अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. छुटकन रामपाल साफी (२३ वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

Borivali Crime
Bhayandar News: अमानुषतेचा कळस! संडे मंडेची स्पेलिंग येत नसल्याने ६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण; पोलिसांत तक्रार दाखल

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, पंधरा मे रोजी राममंदिर ते जोगेश्वरी (Jogeshwari) रेल्वे स्टेशन दरम्यान एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे नेला असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यामुळे हत्या या प्रकरणाचा तपास बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल कदम, पोनि नितीन लोंढे, पोनि सतीश शिंदे, सपोनि जयंत हंचाटे यांनी सुरू केला. (Latest Marathi News)

असा झाला खुलासा...

पोलिस तपासात मृत संदेश पाटील या युवकाचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तरुणीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. यावेळी तिचा मोबाईल तपासला असता छुटकन साफी हे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता मृत संदेश पाटीलसोबत आरोपी छुटकन फिरत असल्याचे आढळून आले.

Borivali Crime
J P Nadda On Thackeray Government: ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गंभीर आरोप

या छुटकनकडे तपासणी केली असता सुरूवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच प्रेम प्रकरणातुन ही हत्या केल्याचा खुलासाही त्याने यावेळी केला. (Borivali Crime)

प्रेमप्रकरणातून काढला काटा...

मृत तरुणाचे तो काम करत असलेल्या बँकेतील तरुणीसोबत प्रेम संबंध होते. याच तरुणीचे पूर्वी आरोपीछुटकन रामपाल साफी या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने छुटकन साफी आपले प्रेम पुन्हा मिळावे यासाठी प्रयत्न करत होता.

पण संदेश पाटील अडथळा ठरत असल्याने आरोपीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. छुटकन साफी याने संदेश पाटील याची हत्या करून चेहरा ओळखता येऊ नये यासाठी चेहरा दगडाने ठेचला. तसेच हत्येनंतर राम मंदिर ते जोगेश्वरी दरम्यानच्या ट्रॅकवर मृतदेह फेकून दिला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com