BMC
BMC Saam Digital

BMC Property Tax News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मालमत्ता कर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार

BMC Property Tax Update News : चालू आर्थिक वर्षाचं शेवटचा दिवस जवळ आल्याने महापालिकेने आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

Property Tax News :

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. चालू आर्थिक वर्षाची ३१ मार्च ही शेवटची तारीख जवळ आल्याने मुंबई महापालिकेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजासाठी एकच धावपळ पाहायला मिळत आहे. या मार्च महिन्यात २३ आणि २४ मार्चला साप्ताहिक सुट्टी आहे. तसेच २५ मार्च रोजी धुलिवंदन आणि २९ मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मालमत्ता कराची वसुली आणि चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस जवळ आल्याने महापालिकेने आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

महापालिकेने आठवड्याच्या सुट्टीतही कर भरण्याची सोय होण्यासाठी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या अडचणीचं तत्काळ निवारण करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक विभागात उपलब्ध असणार आहे.

BMC
Mumbai News: मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवली;पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नेमकं कारण काय?

पालिकेच्या करसंकलन विभागाकडून चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेडून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी सोशल मीडियावरही जनजागृती करण्यात येत आहे.

३१ मार्च २०२३ पर्यंतच्या 'टॉप टेन' थकबाकीदारांची यादी

१. एल अँड टी स्कॉमी इंजिनिअरिंग - ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये

२. रघूवंशी मिल्स - ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये

३. एचडीआयएल - ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये

४. पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले - ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये

BMC
Mumbai News: वर्सोव्यात सिनेस्टाईल थरार, दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, पोलिसांनी पाठलाग करून पकडलं

५. एचडीआयएल - ४४ कोटी ०५ लाख ५४ हजार ३५ रुपये

६. रघूवंशी मिल्स - १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये

७. सुभदा गृहनिर्माण संस्था - १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये

८. नॉव्हेल्टी सिनेमा - १६ कोटी ०१ लाख ८० हजार ६३ रुपये

९. ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. - १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये

१०. गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि - ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com