Mumbai Police: जामीन मिळवून देतो असं सांगत आरोपीकडे 50 लाखांची मागणी, पोलीस अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा

निलंबित पोलीस अधिकारी अनिलने आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती.
Mumbai Police
Mumbai Police Saam Tv
Published On

मुंबई: मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यात आरोपी़कडे खंडणी मागितल्या प्रकरणी एक पोलीस अधिकारी, एक निलंबित पोलीस अधिकारी आणि अन्य एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Mumbai Chembur police file case against one police officer and one suspended officer for asking ransom to accused).

Mumbai Police
Bandatatya Karadkar : बंडातात्यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार, ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रशासन दाखल

पोलीस (Police) अधिकारी शालिनी शर्मा, निलंबित पोलिस अधिकारी अनिल उर्फ भाणुदास जाधव आणि राजु सोनटक्के अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींमधील निलंबित पोलीस अधिकारी अनिल याने आरोपीला जामीन (Bail) मिळवून देण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती.

Mumbai Police
Nitesh Rane : आमदार नितेश राणेंना तपासासाठी आणलं कणकवली पोलिस ठाण्यात, पाहा हे प्रकरण

पैसे न दिल्यास अशाच प्रकारे इतर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपीचा ताबा देण्याची धमकी त्या निलंबित अधिकाऱ्याने दिली होती. तर सोनटक्के याने आरोपीकडे 2 लाख रुपये व्हॉट्सअॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com