मुंबई: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामांचे १७८६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रेटीकरणाच्या रस्त्यांच्या प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता.
मुंबई: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामांचे १७८६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर
मुंबई: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामांचे १७८६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूरSaam Tv
Published On

मुंबई: मुंबई महापालिकेतील (BMC) सत्ताधारी शिवसेनेने आज स्थायी समितीत भाजपच्या विरोधानंतरही १७८६ कोटींचे रस्ते बांधणीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रेटीकरणाच्या रस्त्यांच्या (Roads) प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. एकूण १७८६ कोटी ४७ लाख रुपयांचे ४० प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र यात कंत्राटदारांनी उणे १६ ते २७ टक्के उणे दराने निविदा आणल्यामुळे भाजपने स्थायी समितीत हा प्रस्ताव दफतरी दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच निविदा उणे दराने असल्यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा कसा राखला जाईल, गुणवत्ता काय व किती कालावधी लागेल याबाबत प्रशासनाने अहवाल सादर करण्याचीही मागणी केली आहे. (Mumbai: A proposal of Rs 1786 crore for road works has been approved on the backdrop of elections)

हे देखील पहा -

दरम्यान भाजपने याबाबतची उपसूचना मांडल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने (Shivsena) बहुमताने प्रस्ताव मंजूर केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते यांनी देखील रस्त्यांची काम झालीच पाहिजे असे म्हंटले आहे. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रस्ते काम सुरु असतानाच रस्त्यांचे ऑडिट झाले पाहिजे, तसेच रस्ते कामात काही चुकीचे आढळ्यास ठेकेदारावर व रस्ते अभियंता किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे निर्देश प्रशासनानाला दिले आहे.

रस्त्यांचे कोट्यवधी किंमतींचे प्रस्ताव -

वरळी - ७१ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये

मरीनलाईन्स - ४७ कोटी ९८ लाख ७१ रुपये

अंधेरी पूर्व - ७२ कोटी ५४ लाख ९५ हजार

अंधेरी पश्चिम - २१ कोटी ५८ लाख ५६ हजार

मालाड - ७३ कोटी ३८ लाख ७० हजार

ग्रटरोड - ९० कोटी २४ लाख ५७ हजार

परळ- ५३ कोटी ५४ लाख ७७ हजार

गोरेगाव - १९ कोटी ३२ लाख ६ हजार

चेंबूर - ३८ कोटी ६७ लाख १२ हजार

वांद्रे - ११४ कोटी ४९ लाख १८ हजार

वांद्रे दादर - २७ कोटी २२ लाक ७४ हजार

मुलुंड - ५० कोटी १४ लाख ५८ हजार

परळ - ३९ कोटी ५४ लाख ०३ हजार

घाटकोपर आणि मुलुंड म्हाडा परिसरातील रस्ते - ७० कोटी ८० लाख ९१ हजार

दहिसर - २६२ कोटी ४२ लाख ५५ हजार

भांडूप -१४७ कोटी ४७ लाख ०१ हजार

कुर्ला आणि चेंबूर २१७ कोटी ५९ लाख ५८ हजार

भायखळा - १०७ कोटी ०१ लाख ३७ हजार

खार - ५४ कोटी ४६ लाख ८३ हजार

कांदिवली १०० कोटी ५५ लाख ६२ हजार

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com