Mumbai : मुलुंडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; दोघांचा मृत्यू

मुंबईतून मोठं वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मुलुंड पूर्व भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
mumbai news
mumbai news saam tv

मुंबई : मुंबईतून मोठं वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मुलुंड (Mulund) पूर्व भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या छताच्या भागात आणखी माणसं दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. (Mulund building collapse News)

mumbai news
बाळासाहेब 'वंदे मातरम' म्हणायचे; शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या निर्णयाचं शिवसेनेकडून समर्थन

मुलुंड पूर्वेतील नाणेपाडा भागातील मोती छाया इमारतीत ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देवशंकर नाथालाल शुक्ला (वय 93 ) आणि अर्खीबेन देवशंकर शुक्ला (वय 87) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे . सदर ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. या इमारतीच्या भागात अजून कोणी दबले गेले आहे का, याची शोध मोहिम सुरू आहे.

mumbai news
...अन् कुटुंबीयांसमोरच तरूण नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून मोती छाया इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यामुळे इमारतील मुंबई महापालिकेडून नोटीस देखील बजवण्यात आली होती. सदर इमारत ही वीस ते पंचवीस वर्षे जुनी आहे. या आधी म्हणजेच काही महिन्यापूर्वी कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये चार मजली इमारत कोसळली होती. त्या घटनेतही अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईतील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com