मावळ: युरोपातील रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) या देशातं युद्ध सुरु आहे. रशियाने ज्या युक्रेनवर हल्ला (Russia - Ukraine War) केला त्या देशात जवळपास २० हजारांपेक्षा जास्त भारतीय (Indians) अडकले आहे. ज्यात बहुतांश हे तरुण भारतीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आहे. युद्ध सुरु झाल्याने युक्रेनमध्ये हवाई वाहतूक (Air Transport) आणि इतर सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे ज्यामुळे हजारो भारतीय युद्धग्रस्त (War Zone) युक्रेनमध्ये अडकले आहेत. याच विद्यार्थ्यांपैकी असलेल्या मावळ (Maval) तालुक्यातील दोन विद्यार्थीनी मोनिका आणि महक यांच्या कुटुंबियांना अश्रु अनावर झाले, आपल्या मुलींना भारतात परत आणावे यासाठी त्यांनी सरकार दरबारी आर्जव केला आहे. ('Monika and Mehar' from Maval taluka has stuck in Ukraine warzone; Families appeal to government to bring back girls ...)
हे देखील पहा -
मोनिकाच्या आई-वडिलांना अश्रू अनावर; मोनिकाच्या आईने थेट देवच ठेवले पाण्यात...
मोनिका दाभाडे (Manika Dabhade) ही अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मधून युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेल्याने आता ती परत कशी येणार या कल्पनेने तिच्या आई वडिलांना अश्रू अनावर होत आहेत. मोनिकाचे वडील हे ड्रायव्हर आहेत. कर्ज काढून आणि काही संस्थांच्या मदतीने पैसे जमा करून मोनिकाला युक्रेनमध्ये (Ukraine) शिक्षणासाठी पाठवले होते. मोनिका ही MBBS च्या शेवटच्या वर्षाला शिकत असून दोन महिन्यानंतर शिक्षण संपवून भारतात परत येणार होती. परंतु युद्ध सुरू झाल्याने आता मोनिका भारतात परत येणार कशी? हा प्रश्न दाभाडे कुटुंबियांसमोर उभा आहे. त्यामुळे मोनिकाचे आई आणि वडील या दोघांनाही अश्रू अनावर झाले आहेत.
मोनिकाच्या आईने थेट देवच पाण्यात ठेवले आहेत. मुलीची सुखरूप सुटका होऊन ती भारतात परत यावी अशी प्रार्थना दाभाडे कुटुंबीय देवाकडे करत आहे. कोणत्याही बड्या लोकांशी ओळख नसल्याने कोणाची मदत घ्यावी हाही प्रश्न दाभाडे कुटुंबियांना पडला आहे. केवळ मावळचे आमदार सुनील शेळके यांना संपर्क करून मुलीला परत भारतात आणण्याची विनंती त्यांनी केली आहे. आपण सुखरूप असल्याचा फोन मोनिकाने केला आहे. मात्र तरीदेखील मोनिकाचे आई-वडील हे चिंतेत असल्याचे पहायला मिळत आहे. सरकारने लवकरात लवकर आमची मुलं भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती दाभाडे कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे.
महकशी व्हिडिओ कॉलवर बोलण होतं, पण...
मावळातील लोणावळा येथील महक प्रदीप गुप्ता (Mehak Gupta) ही विद्यार्थिनी युक्रेनच्या ओडेसा शहरात वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसच्या (MBBS) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. मात्र युद्धग्रस्त युक्रेमध्ये ती अडकली आहे. सध्या ती सुरक्षित असून दररोज गुप्ता कुटुंबियांचं महकशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं होत असतं. परंतु युद्धामुळे कधीही या विद्यार्थिनींच्या जीवाला धोका होऊ शकतो. यासाठी गुप्ता कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही संपर्क साधला असून लवकरच तिला भारतात सुरक्षित घेऊन येणार असल्याचं कुटुंबीयांनी सांगितले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.