मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर

मुस्लिम बांधवांकरीत मोठा सण असलेला मोहरम उद्या १९ ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. रमजान ईद, बकरी ईद प्रमाणे सरकारने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेत मोहरमकरिता ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर
मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिरSaam Tv
Published On

मुंबई : मुस्लिम बांधवांकरीत मोठा सण असलेला मोहरम Moharram उद्या १९ ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. रमजान ईद, बकरी ईद प्रमाणे सरकारने कोविड Covid प्रादुर्भाव लक्षात घेत मोहरमकरिता ही नियमावली Rules जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे Corona उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, इतर कार्यक्रमांप्रमाणे यावर्षी देखील मोहरम साध्या पध्दतीत पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यंदा धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने, सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आले आहेत. पण काल मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास, याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे.

हे देखील पहा-

केवळ लसीकरण Vaccination पूर्ण होऊन, १४ दिवस झालेल्या भाविकांनाच ताजियाच्या मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असणार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करण्यात आले आहे. पण रस्त्यावर पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. ७ ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी असणार आहे. एका ट्रकवर केवळ १५ जणांनाच मुभा देण्यात आली आहे.

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर
''वारी बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणिला बोळा आणि दरवाजा उघडा''

-मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा.

-कालच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास सर्शत परवानगी दिली आहे.

- सोसायटी मधील नागरिकांनाही एकत्रित दुखवटा करू नये.

-वाझ/ मजलीस ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत.

-ताजिया/ आलम काढू नये

-सबील/ छबीलसाठी शासनाची परवानगी आवश्यक, बाटलीबंद पाणीच द्यावे लागणार.

-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक -प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे या नियमावलीत म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com