Kalyan News: 48 तासात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवू, मनसेचा केडीएमसीला इशारा

MNC On KDMC : कल्याण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसीच्या शहर अभियंत्यांची भेट घेत जाब विचारला.
48 तासात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवू, मनसेचा केडीएमसीला इशारा
Kalyan NewsSaam Tv
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसीच्या शहर अभियंत्यांची भेट घेत जाब विचारला. तसेच अधिकाऱ्यांनी येत्या 48 तासात जर रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात बसवू, असा इशारा देखील मनसेने दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली आहे. पावलो पावली असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र अद्यापही रस्त्यांवरील परिस्थिती जैसे थे आहे.

48 तासात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवू, मनसेचा केडीएमसीला इशारा
Badlapur Case Update: बदलापूर पोलिसांचं कुठं चुकलं? हायकोर्टाने व्यक्त केली तीव्र नाराजी

पावसाचे कारण महापालिकेचे खड्डे भरण्याचे काम हे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आता केला जातोय . या खड्ड्यांप्रश्नी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली.

48 तासात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवू, मनसेचा केडीएमसीला इशारा
Clash Between Jawan And Naxal : छत्तीसगडच्या सीमवेर धुमश्चक्री; जवानांनी ९ नक्षलवाद्यांचा केला खात्मा, आता घटनास्थळी परिस्थिती काय?

शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत त्यांना जाब विचारला. यावेळी मनसेने खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांना 48 तासांची मुदत दिली असून, या वेळेत रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत. तर अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यांमध्ये बसवण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com