मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नक्कल करत टीका केली होती.
मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!
मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!SaamTvNews
Published On

कल्याण : राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली होती. याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी "मिटकरी यांच्या बद्दल बोलणे म्हणजे आम्हालाच लाजल्यासारखे होते, मूर्खाबद्दल काय बोलणार" असा टोला लगावला आहे. आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आज कल्याण (Kalyan) ग्रामीण भागात सुरू झालेले लोडशेडिंग, वीजबिलासोबत आलेली डिपॉझिटची बिले आदी समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर शहरात देखील एक दिवस एक प्रभाग अशी योजना सुरू करा जेणेकरून नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील अशी मागणी केली.

हे देखील पहा :

कल्याण ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व वीज ग्राहकांना अचानक वीज बिलासोबत आलेले डिपॉझिटचे बिल यामुळे संतापाचे वातावरण आहे. याबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. कल्याण ग्रामीण भागात 'एक गाव एक दिवस' अशी योजना महावितरण अधिकाऱ्यांकडून राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत महावितरणचे अधिकारी गावात येऊन दिवसभरात गावातील समस्यांचे निराकरण करतात.

मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!
संपानंतर ST रुळावर; मात्र सुविधांकडे लक्ष कोण देणार?

याच पार्श्वभूमीवर शहरात देखील 'एक दिवस एक प्रभाग' अशी योजना सुरू करा जेणेकरून नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील अशी मागणी केली. या बैठकीत कल्याण ग्रामीण मधील भोपर नांदीवली भागात नियमित भारनियमन नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आवश्यकता भासल्यास भारनियमन होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, याबाबत आमदार पाटील यांनी छुप्यापद्धतीने भारनियमन सुरु असल्याचा आरोप केला. तसेच वीजग्राहकांना अचानक डिपॉझिटची बिले पाठवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत सदर बिले न भरल्यास नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करू नका, त्यांना ते बिल भरण्यासाठी अवधी द्या किंवा ऐच्छिक करा, लोकांवर दबाव टाकू नका अशी मागणी केली.

मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!
राज्यात वीज टंचाई, त्यात वीजचोरी; महावितरण उचलणार कठोर पाऊल!

याचवेळी बोलताना आमदार राजू पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. मनोरुग्ण माणसाबद्दल काय बोलणार अशी टीका राजू पाटील यांनी मिटकरी यांच्यावर केली. पुढे बोलताना पाटील म्हणाले, शरद पवार यांनी देखील मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना हे वक्तव्य मिटकरी यांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे म्हट्ले आहे.

मनोरुग्णाबद्दल काय बोलणार?; मनसे आमदार राजू पाटलांचा मिटकरींना टोला!
EV Blast : चार्जिंगदरम्यान ई-स्कुटरच्या बॅटरीचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू!

त्यामुळे अश्या गोष्टींसाठीच राष्ट्रवादीकडून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते आणि नंतर घुमजाव केला जातो असे म्हटले आहे. मात्र, जनता मूर्ख नाही. भोंग्यांचा मुद्दा सामाजिक प्रश्न म्हणून मनसेने घेतला असून राज ठाकरे यांची हि भूमिका जुनीच आहे. कोणत्याही धर्माच्या लोकांनी आपला धर्म घरीच ठेवाव हि राज ठाकरेंची भूमिका असून मिटकरी यांच्याबद्दल बोलताना आम्हाला लाजल्यासारखे होते अशी कोपरखळी राजू पाटील यांनी मिटकरींना मारली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com