राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी का आहे ? मनसेचा मंत्रिमंडळ विस्तारावरून देवेंद्र फडणवीसांना सवाल

मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या शालिनी ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे
Devendra Fadnavis and Raj thackeray
Devendra Fadnavis and Raj thackeray saam tv

रुपाली बडवे

मुंबई : राज्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार काल मंगळवारी पार पडला. तब्बल शिंदे सरकारला ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुहूर्त सापडला. काल सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या शालिनी ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. (MNS On maharashtra cabinet expansion )

Devendra Fadnavis and Raj thackeray
Shivsena| मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच; एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे दानवे

शालिनी ठाकरे म्हणाल्या, '२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी २४ महिला आमदार आहेत. त्यातल्या १२ महिला आमदार भाजपच्या आहेत. तरीही भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपद द्यावंसं वाटलं नाही! खरंच, आपले सत्ताधारी, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी #AntiWomen का आहे?'

Devendra Fadnavis and Raj thackeray
डागाळलेल्यां लोकांना मंत्रिमंडळात का घेतलं? शिंदे सरकारच्या विस्तारावर संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

शालिनी ठाकरे पुढे म्हणाल्या, 'महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन ३९ दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही. यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार महिलांना 'दुय्यम' वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे. राज्यातल्या ५ कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com