असली गुवाहाटीत, नकली 'वर्षा'वर; मनसेनेकडून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

'काँग्रेससोबत जायचं असेल तर मी शिवसेना पक्ष बंद करेल, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.'
Shivsena Vs MNS
Shivsena Vs MNSSaam TV
Published On

मुंबई : असली गुवाहीटीत, नकली "वर्षा"वर आणि सेक्युलर गॅसवर अशा खोचक शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला सूरतमधील मुक्काम गुवाहाटीला हलवला आहे. याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ट्विट करत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

तसंच त्यांच्या ट्विटनंतर साम टीव्हीने देशपांडे यांची प्रतिक्रिया घेतली यावेळी ते म्हणाले, ' असली गुवाहीटीत, नकली "वर्षा"वर (Varsha) आणि सेक्युलर गॅसवर आहेत. काँग्रेससोबत जायचं असेल तर मी शिवसेना (shivsena) पक्ष बंद करेल, असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते. मात्र, आता सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्यासोबत आमदार नव्हते. पण, मुद्दा हिंदुत्वाचा होता. आता इतरांप्रमाणे आम्हालाही उत्सुकता आहे. असं देशपांडे म्हणाले आहेत. दरम्यान, आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना केलं आहे. तसंच सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाहीत.

जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आपण शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे देखील पाहा -

राज्यपालांना कोरोनाची लागण -

दरम्यान, शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता गुहावाटीला हलवला आहे. शिवाय शिंदे यांनी आज दुपारी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला असल्याची माहिती समोर येत होती.

मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून सध्या त्यांना रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com