Amit Thackeray Statement: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं...

Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्राला लाज वाटेल असं राजकारण सध्या सुरु आहे, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.
Amit Thackeray Statement
Amit Thackeray StatementSaam Tv
Published On

Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी मोठा राजकीय (Maharashtra Politics) भूकंप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र यावेत या आशयाचे बॅनर राज्यभरात झळकले. त्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Amit Thackeray Statement
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात असतानाच आता राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मोठे विधान केले आहे. 'दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे. ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही.', असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे.

Amit Thackeray Statement
Maharashtra Politics: शरद पवारांना विठ्ठल म्हणणं तात्काळ थांबवा; अन्यथा... तुषार भोसलेंचा इशारा

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. 'सध्याच्या राजकीय परिस्थिती खूपच भीषण आहे. फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच अशात 'एक सही संतापाची' या पद्धतीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे.', असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

Amit Thackeray Statement
Jitendra Awhad News: अजितदादांनी परत यावं, मी राजकारण सोडतो; जितेंद्र आव्हाडांची भावनिक साद

त्यांनी पुढे सांगितले की, ' राज्यातील विषय गंभीर असताना आपण मात्र युत्या आघाड्यावर बोलत आहोत. महाराष्ट्रात काय चालले आहे हे मल कळतच नाही. महाराष्ट्राला लाज वाटेल असं राजकारण सध्या सुरु आहे. आम्ही या राजकीय चिखलात नाही याचा आम्हाला अभिमान आहे.'

तसंच, 'एका आमदाराचे आम्ही शंभर करू. राजकारणाचा आम्ही चिखल करणार नाही. दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे. ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही.'असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, 'पक्षाचे दौरे सुरू होतायत. लवकरच मुंबईत ही मेळावा होणार आहे. आम्ही शांततेत पक्ष बांधत आहोत.' असं देखील ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com