मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाला आहे. राज ठाकरे हे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पायाचे दुखणे वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. ( Raj Thackeray News In Marathi )
हे देखील पाहा -
गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. मंगळवारी त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घरी दाखल झाले आहेत. कोरोना चाचणी निगेटिव्ह येत नाही, तोवर शस्त्रक्रिया होणार नाही, अशी माहिती डॉ. जलील परकर यांची माहिती दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना कोरोना लागण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सचिन मोरे म्हणाले,'कोविडच्या कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे'
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.