Ratnakar Gutte: आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका, कोट्यवधींची संपत्ती जप्त...

MLA Ratnakar Gutte: डिसेंबर 2020 मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात एजन्सीने ही मालमत्ता जप्त केली होती.
MLA Ratnakar Gutte Fraud Case
MLA Ratnakar Gutte Fraud CaseSaam Tv
Published On

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रीय समाज पक्षाचे (आरएसपी) महाराष्ट्रातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte, MLA) आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. डिसेंबर 2020 मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात (Money Laundering Case) एजन्सीने ही मालमत्ता जप्त (Confiscated) केली होती. एजन्सीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 255 कोटी रुपये आहे. (MLA Ratnakar Gutte hit by ED, crores of assets confiscated ...)

हे देखील पहा -

गुट्टे यांच्यावर एजन्सीने (ED) ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात (Bank Fraud Case) गुन्हा दाखल केला होता. ज्यात त्यांनी विविध गरीब शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून कर्ज (Loan) घेतले. हे कर्ज एका योजनेंतर्गत होते, जेथे बँकांनी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी उपकरणे, बियाणे, खते, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दिले होते. बँकांकडून घेतलेली कर्जे 2012-13 आणि 2016-17 दरम्यान होती. हे कर्जाचे पैसे बँकांकडून वितरीत झाले खरे मात्र ते गंगाखेड शुगरच्या विविध खात्यांमध्ये वळते करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढले त्यांना काहीच मिळाले नाही.

MLA Ratnakar Gutte Fraud Case
Crime: चित्रपटात काम देतो म्हणायचा अन् विनयभंग करायचा; कास्टिंग डायरेक्टरला बेड्या

न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये गंगाखेड साखर कारखाना आणि २४७ कोटी किमंतीची यंत्रसामग्री, इतर तीन संलग्न कंपन्यांची सुमारे ५ कोटी रुपयांची जमीन आणि डिसेंबर २०२० मध्ये यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या काही मालमत्तांचा समावेश आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com